मुंबई उच्च न्यायालय 2331 पदांची भरती
मुंबई, दि. 16 : मुंबई उच्च न्यायालयअंतर्गंत मुंबई मुख्यालय तसंच, नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एकूण 2331 रिक्त पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.
पदाचे नाव आणि जागा
शिपाई, हमाल, फराश पदासाठी- 887 जागा
वाहन चालक पदासाठी- 37 जागा
लिपिक पदासाठी- 1,332 जागा
स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी) पदासाठी- 56 जागा
स्टेनोग्राफर (वरिष्ठ श्रेणी) पदासाठी 19 जागा
अशा प्रकारे एकूण 2,331 पदे भरली जाणार आहे.
मुंबई हायकोर्टात क्लर्क, स्टेनोग्राफरसह अन्य पदांसाठी भरती पक्रिया 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारिख 5 जानेवारी 2026 ही आहे. उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता.या अंतर्गंत क्लर्क, स्टेनोग्राफर याव्यतिरिक्त अन्य सहाय्यक पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करताना एक हजार रुपयांची फी भरावी लागणार आहे.ही फी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.
SL/ML/SL