या तारखेपासून सुरु होणार मुंबई-गोवा ‘वंदे भारत’
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्व सुख सुविधांनी अद्ययावत असल्यामुळेप्रवाशांना सुखद आनंद देणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा सुसाट प्रवास आता हळूहळू देशभर विस्तारू लागला आहे. देशभरातील पर्यटकांचे आवडीचे डेस्टीनेशन असलेल्या गोवा या ठिकाणी जाण्यासाठी देखील ‘वंदे भारत’ एक्स्पप्रेस सुरू होत आहे. कोकणवासियांची वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा संपली आहे. कोकण रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसच्या धावण्याच मुहूर्त ठरला आहे. येत्या ३ तारखेला मुंबई ते मडगाव दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते मडगाव हे अंतर १ तासाने कमी होणार आहे. आठवड्यातून ६ वेळा ही एक्सप्रेस चालवण्याचा विचार केला जात आहे. त्यासाठी ८ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस बनवण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून ठेवणारी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस असेल. तर सेंटर रेल्वेवरून सुटणारी तिसरी आणि मुंबईवरून सुटणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे.
सध्या राज्यात तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-साबरमतीदरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर मुंबई- शिर्डी अशी तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस धावली.
SL/KA/SL
31 May 2023