जूनपर्यंत पूर्ण होणार मुंबई -गोवा हायवे, नितीन गडकरी यांची माहिती
मुंबई गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते. मुंबई-गोवा रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.