अठरा वर्षांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील 9 ब्लॅकस्पॉटचा अडसर दूर होणार
महाड दि २५ (मिलिंद माने) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वरील अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बंगलापर्यंतच्या असलेल्या ९ ब्लॅक स्पॉटचा अडसर दूर करण्यात यश आल्याची माहिती महामार्ग पोलीस महाड विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र ढाकणे यांनी बोलताना दिली. यामुळे १८ वर्षानंतर का होईना राष्ट्रीय महामार्ग विभागाला आता जाग आल्याने महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील १८ वर्षापासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे यामुळे या महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका चालू आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते कशेडी बंगला या मार्गावर झालेल्या विविध अपघातामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर काही जण कायमचे या अपघातात त्यांना अपंगत्व आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बंगला पर्यंत ९ ब्लॅक स्पॉट आहेत. महामार्गावर तत्कालीन काळात झालेल्या या अपघातांच्या केलेल्या दोन्ही विभागांकडून तपासांती ९ ब्लॅक स्पॉट निदर्शनास आले होते. यासंदर्भात महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच प्रवासी वर्गाला सावधानतेचा इशारा देणारे फलक तसेच स्पीड ब्रेकर अत्यावश्यक ठिकाणी बसवून या अपघातांचा नियंत्रित करण्या चा प्रयत्न करण्यात आला होता.
मागील पाच वर्षापासून सुरू असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून यादरम्यान या दोन विभागांकडून करण्यात आलेल्या योजनांना अंतिम रूप प्राप्त झाल्याने या सर्व ठिकाणी होणाऱ्या अपघात आता कायमस्वरूपी दूर करण्यात यश आल्याची माहिती उपनिरीक्षक ढाकणे यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर पासून असणारे ब्लॅक स्पॉट पुढीलप्रमाणे ; मुगवली, तळेगाव, रेपोली लोणेरे टेम पाले ,लाख पाले , वीर, दासगाव ,लोहारे हे पोलादपूर- कशेडी बोगद्यापर्यंत असणारे ब्लॅक स्पॉट असून . या ठिकाणी झालेल्या अपघातांची मागील काळातील संख्या मोठी होती मात्र महामार्गाच्या झालेल्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामाने या अडचणी आता कायमस्वरूपी दूर करण्यात आल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर महाड उपविभागामध्ये महाड शहराच्या पश्चिमेकडे गांधार पाले नजीक असलेल्या महामार्ग पोलीस ठाण्याचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती ही याप्रसंगी ढाकणे यांनी दिली ही संबंधित जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने या ठिकाणीच सार्वजनिक सोयी सुविधा संदर्भात योजना प्रस्तावित असून त्याच ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग पोलिसांना स्वतंत्रपणे इमारत बांधून देण्याबाबतच्या प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या ९ ब्लॅक स्पॉटला मागील काही वर्षात दोन्ही विभागांकडून स्पष्टपणे निर्देशित करण्यात आल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे हा धोका आता कायमस्वरूपी दूर झाल्या असल्याकारणाने वाहतूक यंत्रणा तसेच प्रवासी वर्गातून दोन्ही विभागांना धन्यवाद देण्यात येत आहेत.