जगातील २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत मुंबई

मुंबई, दि. २२ : भारतातील प्रमुख शहर मुंबईने जून महिन्यात बेर्ले नॉटिंघम डिझाइन स्टुडीओतर्फे जगभरातील १२५ शहरांमधून निवडलेल्या २० सर्वाधिक रंगीबेरंगी शहरांच्या यादीत १७वा क्रमांक पटकावला आहे. निळे शहर म्हणून प्रसिद्ध जोधपूरने या यादीत ५वा क्रमांक मिळवला. इटलीमधील इंद्रधनुषी गाव बुरानो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
या यादीत हवाना (क्युबा), इस्तंबूल (तुर्की), कोपेनहेगन (डेन्मार्क), रिओ डी जानेरो (ब्राझील) आणि ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिना) ही इतर काही उल्लेखनीय शहरे होती. सॅनफ्रान्सिस्को (यूएसए) आणि हो ची मिन्ह (व्हिएतनाम) ही शहरे मुंबईच्या खालोखाल होती. हैदराबादही या यादीत सामील होते. परंतु त्यांना अव्वल २० शहरांमध्ये स्थान मिळवता आले नाही.
रंगीत मुंबई
मुंबईचे रंगवैविध्य हे नियोजनबद्ध नाही, तर खूपच नैसर्गिक पद्धतीने विकसित झाला आहे. शहराच्या जुन्या इमारती, गजबजलेले बाजार, समुद्रकिनार्यावरील वस्ती, रेल्वे स्थानकांच्या फेरीवाले आणि चकचकीत बिल्डिंग्स—या सगळ्यांचं एकत्रित दृश्य म्हणजे रंगांचा एक अप्रतिम कोलाज. तपकिरी आणि विटारंग असलेली वास्तुशैली, केशरी आणि पिवळ्या रंगांचे जीवनशैलीतील घटक, तर हिरव्या झाडांची विरळ हिरवळ… हे सगळं मिळून मुंबईला एक अनोखं रंगरूप देतात.
SL/ML/SL
मुंबई, दि. २२ :