मुंबई दूरदर्शनचे ज्येष्ठ रंगभूषाकार डी.सोमकुंवर यांचे निधन…!
नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरदर्शन केंद्र, मुंबई येथे ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले डी.सोमकुंवर यांचे शनिवार दि.७/९/२०२४ रोजी नागपूर येथे राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी अकस्मात नैसर्गिक दु:खद निधन झाले.
डी. सोमकुंवर हे रंगभूषेच्या क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव…! सत्तरच्या दशकात जगप्रसिद्ध एफ.टी.आय.आय. पुणे येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी मुंबई दूरदर्शन आणि कलाक्षेत्रात आपला रंगभूषाकार म्हणून ठसा उमटवला होता. त्यांनी रंगभूषेवर देशपातळीवर अनेक कार्यशाळा घेतल्या तसेच अनेकांना त्यांनी रंगभूषेचे प्रशिक्षण दिले.
रंगभूषेवर त्यांनी लिहिलेले ‘रंगभूषा गाईड’ , ‘कोकणातील रमाबाई’, ‘मौर्य राजवंश’, ‘सिद्धार्थ जन्मला लुंबिनी’ ही पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी संक्षिप्त तिपिटकाचे संकलन केलेले आहे. त्यांनी अनेक सांस्कृतिक संस्था स्थापना केल्या होत्या. त्यांनी १९८७-८८ या काळात ‘शरण बुद्धा’ या स्वलिखित नाटकाची निर्मितीही केली होती.
ML/ML/PGB
9 Sep 2024