स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचे सकारात्मक परिणाम

 स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन मोहिमांचे सकारात्मक परिणाम

मुंबई, दि १७

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सखोल स्वच्छता मोहिमेचे तसेच फेरीवाला-मुक्त रस्ते व पदपथ धोरणाचे सकारात्मक व प्रत्यक्ष परिणाम आता नागरिकांना प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. सातत्यपूर्ण व काटेकोर अंमलबजावणीमुळे विविध प्रशासकीय प्रभागांतील रस्ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ, नीटनेटके व सुशोभित स्वरूपात दिसून येत आहेत. घनकचरा व्यवस्थापन (SWM) अधिक प्रभावीपणे राबविल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. तसेच, काही प्रमुख पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे अनेक रस्ते व पदपथ फेरीवाला-मुक्त झाले असून नागरिकांना आता सुरक्षित, मोकळ्या व अडथळारहित मार्गाने चालण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सकारात्मक सुधारणांबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे.

महानगरपालिका आयुक्‍त श्री. भूषण गगराणी यांच्‍या नेतृत्‍वाखाली तसेच अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन व अतिक्रमण निर्मूलन विभाग समन्वयाने आणि प्रभावीपणे कार्यरत आहेत. स्वच्छता मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित निरीक्षण, क्षेत्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती, तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही यामुळे रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा दर्जा लक्षणीयरित्या उंचावला आहे. यासोबतच पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई, पोलीस व संबंधित विभागांशी समन्वय, तसेच पुनरावृत्ती टाळण्यासाठी सातत्यपूर्ण देखरेख राबविली जात आहे. या सर्व उपक्रमांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधान वाढत आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, घनकचरा व्‍यवस्‍थापन विभाग वर्षभर म्‍हणजेच ३६५ दिवस सातत्याने कार्यरत आहे. गत वर्षभरात विविध प्रशासकीय विभगात लोकसहभागातून स्‍वच्‍छता मोहिमा राबविण्‍यात येत आहेत. त्‍याद्वारे सार्वजनिक स्‍वच्‍छता कार्यवाहीस आणखी व्यापक स्वरुप देत नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. या अंतर्गत रस्ते, पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून ३ वेळा स्वच्छता व निर्जंतुकीकरण, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा, निर्मळ कर्मचारी वसाहत, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडा मुक्‍त परिसर आदी कार्यवाही केली जात आहे. अधिकचे मनुष्यबळ व संयंत्रांचा वापर करुन सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला जात आहे. या कामी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी – कर्मचाऱयांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. स्‍वतंत्र पथकेदेखील गठीत करण्‍यात आली आहेत, असेदेखील डॉ. जोशी यांनी नमूद केले.

त्याचा परिणाम म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये मोठी सुधारणा होत आहे. स्‍वच्‍छतेचे दृश्य आणि दूरगामी परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत. या सकारात्मक बदलाबाबत नागरिकांनी अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांना पत्र / संदेश पाठवून महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले आहे. विशेषत: जी उत्‍तर विभागातील रहिवाशांनी घनकचरा व्यवस्थापन तसेच फेरीवाल्यांविषयक प्रश्नांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याबद्दल समाधान व्‍यक्‍त केले आहे. तसेच, या सकारात्मक सुधारणा भविष्यातही कायम राहील आणि इतर दीर्घकालीन प्रलंबित नागरी समस्यांवरही याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे. जी उत्‍तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, लेडी जमशेठजी मार्ग, कटारिया मार्ग, ६० फुटी मार्ग, ९० फुटी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरातील रस्ते अधिक स्वच्छ झाले आहेत. काही प्रमुख पदपथ फेरीवालामुक्त झाले आहेत. वाहतूक पोलिस तैनात असल्‍याने वाहतूक सुरळीत झाल्‍याबद्दल नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *