मुलुंड स्टेशन परिसरातील ६१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन.
मुंबई, दि १३
मुलुंड (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील ६१ अनधिकृत बांधकामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागाकडून आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) निष्कासित करण्यात आलीत. या कारवाईनंतर सुमारे ११०० चौरस मीटर परिसर मोकळा झाला.
उपायुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीत, सहायक आयुक्त (टी विभाग) श्रीमती योगिता कोल्हे यांच्या नेतृत्वात ‘टी’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत विविध विभागांकडून संयुक्तपणे ही कारवाई हाती घेण्यात आली होती.
०४ जेसीबी, ०७डम्पर आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ७० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.
दरम्यान, यापुढेही अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासनाची कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.KK/ML/MS