मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तरडे पॅटर्नच्या चित्रपटांचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी आज पुणे येथे  महाराष्ट्र किंग आणि क्विन contest २०२३ या कार्यक्रम प्रसंगी मुळशी पॅटर्न २ आणि धर्मवीर २ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार असल्याचे घोषित केले.

मुळशी पॅटर्न या चित्रपटात मुळशी तालुक्यातील शेतजमिनींच्या विक्रीमुळे शेतकरी कुटुंबांची झालेली वाताहत आणि त्यातुन उदयास आलेली गुन्हेगारी यांचे चित्रण करण्यात आले होते. ओम भूतकर याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रविण तरडे यांनी देखील अभिनय केला होता. त्याच बरोबर या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन ही जबाबदारीही पार पाडली होती. या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे पुढील भागात काय दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रचंड गाजला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा होती.

त्याचबरोबर प्रविण तरडे यांच्या  स्वामी समर्थांच्या कथेवर आधारित देऊळ बंद या चित्रपटाचा दुसरा भाग देखील यावर्षी पहायला मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

SL/KA/SL

9 Jan. 2023

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *