मुक्ता बर्वेला करायचंय हिंदी चित्रपट आणि OTT मालिकांमध्ये काम
पणजी: ( दि. २२) : राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेने हिंदी चित्रपटांसह ओटीटी मालिकांमध्येही अभिनयाचा अनुभव घ्यायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. ती गेल्या काही काळापासून ऑडिशन देत आहे.
मुक्ता म्हणाली, “मी हिंदी चित्रपट आणि मालिका करण्यास तयार आहे, मी त्यासाठी उत्साहित आहे. मी प्रयत्न करत आहे आणि मी खूप ऑडिशन देत आहे. त्यासाठी मी काही चांगल्या कास्टिंग डायरेक्टरशी संवाद साधत आहे. मला आशा आहे की मला काही चांगल्या भूमिका करायला मिळतील, आशा आहे की मी दुसऱ्या भाषेत चित्रपट करेन,” असे ४६ वर्षीय मुक्ताने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) च्या रेड कार्पेटवर पीटीआयला सांगितले.
तिच्या दोन दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत, अभिनेत्रीने थिएटर ते टीव्ही आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. “चकवा”, “फायनल ड्राफ्ट”, “कबड्डी कबड्डी”, “डबल सीट” आणि “बंदिशाला” सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या बारकाव्यांसाठी तिने व्यापक प्रशंसा मिळवली आहे.
SL/ML/SL