मुकेश अंबानीनी या कॉलेजला दिली १५१ कोटी रु. देणगी

मुंबई, दि.९ : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीला (ICT) १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी १९७० च्या दशकात या कॉलेजमधून पदवी घेतली होती. . आयसीटीची स्थापना १९३३ मध्ये झाली होती. ते देशातील सर्वात प्रतिष्ठीत रासायनिक प्रौद्योगिकी आणि इंजीनियरिंग कॉलेज आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या कॉलेजने शिक्षण, संशोधन आणि रसायन उद्योगात मोठे योगदान दिले आहे.
मुकेश अंबानी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आयसीटी कॉलेजमध्ये गेले. त्या ठिकाणी तीन तास ते थांबले. त्यांनी त्यांचे गुरु प्रोफेसर एम. एम. शर्मा यांची बायोग्राफी ‘डिवाइन सायटिस्ट’ च्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शर्मा सरांच्या लेक्चरच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, शर्मा सरांनी फक्त ज्ञानदानाचे काम केले नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी पॉलीसी मेकर्सला परमीट राज संपवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कंपन्यांना जागतिक पातळीवर काम करता आले.