या दिवशी पूर्ण होणार अयोध्येतील बहुप्रतिक्षित राममंदीर
भूवनेश्वर दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : त्रिपुरामध्ये भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर केली. 1 जानेवारी 2024 पर्यंत मंदिर तयार होईल, असं ते म्हणाले त्यांनी त्रिपुरातील लोकांना राममंदीराला भेट देण्यासाठीचे तिकीट बुक करण्यास सांगितले.
अमित शहा म्हणाले – 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा अध्यक्ष होतो आणि राहुल बाबा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे – मंदिर वहीं बनाएंगे तिथि नहीं बताएंगे. तर राहुल बाबा, कान उघडे ठेवून ऐका, 1 जानेवारी 2024 ला तुम्हाला अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर तयार मिळेल.
केवळ राम मंदिरच नाही तर एक-दोन वर्ष जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचं मंदिरही इतकं भव्य बांधलं जाईल की संपूर्ण जग बघायला येईल. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर बनवला, महाकालचा कॉरिडॉर बनवला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनवले जात आहे. माँ विंध्यवासिनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे. असेही अमित शहा यांनी यावेळी सांगितले.
विशेष म्हणजे देशात २०२४ मध्येच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीखेची घोषणा भाजपच्या मतांच्या राजकारणाशी जोडली जात आहे.
SL/KA/SL
5 Jan. 2023