दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६.०० वा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो.
अन्य पुरस्कार:
सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर
(लोकसंगीत),
अनुराधा भोसले (सामाजिक कार्य),
सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित (अभिनय क्षेत्र), केतकी माटेगावकर (नवोन्मेष)
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलम गोऱ्हे (उपसभापती) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. Mridgandh Lifetime Achievement Award announced to Dilip Prabhavalkar
SL/KA/SL
16Nov 2023