Mpox विषाणूचा जगातील ११६ देशांमध्ये कहर, WHO ने जाहीर केली आणीबाणी
जगावर आता एक नवं संकट आलं आहे. एमपॉक्स (Mpox) नावाच्या विषाणुचा जगातील ११६ देशांमध्ये प्रसार झाला आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावानं ओळखलं जात होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) एमपॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. Mpox ला जागतिक आणीबाणी घोषित करण्याची 2 वर्षातील ही दुसरी वेळ आहे.जेव्हा हा रोग जागतिक स्तरावर पसरू लागला, तेव्हा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये तो अधिक पसरत होता. Mpox अनेक दशकांपासून आफ्रिकेच्या काही भागात आहे. या रोगामुळे फ्लूसारखी लक्षणे आणि पू भरलेले फोड येतात आणि ते सहसा सौम्य असतात, परंतु काहीवेळा ते जीवघेणे असू शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
MPOX टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
• शक्यतो घरी आणि खोलीत रहा.
• साबण आणि हँड सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ धुवा.
• पुरळ बरे होईपर्यंत मास्क घाला.
• जर तुम्ही एकटे असाल तर त्वचा कोरडी करा.
• इतर कोणाच्या संपर्कात आलेल्या गोष्टींना स्पर्श करू नका.
• तोंडात फोड आले असतील तर मिठाच्या पाण्याने गुळण्या करा.