खासदार उदयनराजे भोसले यांनी केले साताऱ्यात शक्तिप्रदर्शन
सातारा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) लोकसभा मतदारसंघ महायुती मधून भाजप पक्षाला सोडावा अशी वारंवार मागणी आपण केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघावर दावा करीत होता. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे भाजप वरिष्ठ नेते अमित शहा यांच्याशी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मित्र पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर भाजप पक्षाची उमेदवारी आपल्यालाच आहे असा दावा करीत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
शिरवळ येथे सुमारे 25 जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. त्याचप्रमाणे दोन क्रेनच्या साह्याने मोठा हार समर्थकांनी खासदार उदयनराजे भोसले यांना घातला. यावेळी सातारा जिल्ह्यातील समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवारी महायुतीच्या वतीने 28 मार्च रोजी जाहीर होणार आहे.
ML/ML/SL
27 March 2024