MP E-Drive योजनेमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत वाढ
मुंबई, दि. ९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : Automobile क्षेत्रात जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारत सरकारकडूननही e-vehicle च्या विक्री आणि उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारच्या MP ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत EV चा प्रचार केला जात आहे. सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात सुरू असलेल्या या योजनेमुळे EV च्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) आणि पीएम ई-ड्राइव्ह योजनांसारख्या उपक्रमांद्वारे, 2024-25 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी विक्री 5,71,411 युनिट्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याच कालावधीत, ई-रिक्षा आणि ई-कार्टसह इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची विक्री 1,164 युनिट्सपर्यंत पोहोचली, तर L5 रेंजमधील इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची विक्री 71,501 युनिट्सवर पोहोचली.
ही योजना 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू करण्यात आली आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेचे उद्दिष्ट ईव्हीच्या अवलंबनाला गती देणे आहे. याशिवाय आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यावरही सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे, वाहतुकीशी संबंधित पर्यावरणीय प्रभाव कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
SL/ ML/ SL
9 Nov. 2024