‘ऑपरेशन सिंदूर’ वर चित्रपटाची घोषणा, निर्माता झाला ट्रोल

 ‘ऑपरेशन सिंदूर’ वर चित्रपटाची घोषणा, निर्माता झाला ट्रोल

मुंबई, दि. १० : पाकविरोधात भारतीय सैन्याने आखलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वरुन बॉलीवूडमध्ये असंवेदनशीलतेचा कहर सुरु असल्याचे दिसत आहे. काल रिलायन्स मिडियासह अन्य अनेकांना या नावाच्या ट्रेडमार्क आणि कॉपीराईटसाठी चढाओढ सुरु केली होती. लोकांच्या जोरदार प्रतिक्रीयांनंतर रिलायन्लने सारवासारव करत यातून माधार घेतली. यात एका निर्मात्याने तर ऑपरेशन सिंदूर या चित्रपटाते संभाव्य पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाची घोषणा करत कहरच केला. लोकांनी केलेल्या प्रचंड ट्रोल नंतर आता त्याने माफी मागितली आहे.

चित्रपट निर्माते निक्की भगनानी यांनी ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले, त्यानंतर लोक संतापले आणि निर्मात्यांना ट्रोल करू लागले. तथापि, निक्की भगनानी यांनी या प्रकरणी माफी मागितली आणि स्पष्ट केले की त्यांचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता.

निक्की-विकी भगनानी फिल्म्स आणि कंटेंट इंजिनिअर यांनी एकत्रितपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली. याचा एक एआय पोस्टर देखील शेअर करण्यात आला. ज्यामध्ये लिहिले आहे- भारत माता की जय, ऑपरेशन सिंदूर.

सोशल मीडिया युजर्सचा संताप

, ‘लाज वाटायला हवी मित्रा, युद्ध सुरू झालं आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘जरी कोणताही अभिनेता याबद्दल बोलत नसला तरी, प्रत्येकजण स्वतःच्या फायद्यासाठी चित्रपट बनवण्यासाठी बाहेर पडला आहे.’ तिसऱ्याने लिहिले, ‘स्वतःला आणि तुमच्या देशाला लाजवण्याचे थांबवा.’

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *