संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महाल येथील केंद्रीय कार्यालयातून काल सांयकाळच्या सुमारास प्रतिपदा उत्सव संचलन काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या तिथीनुसार जन्मदिनच्या निमित्ताने घोष विभागाचे पथसंचलन बडकस चौक येथून संघ मुख्यालयातून पथसंचलनाला सुरुवात करीत डॉ. हेडगेवार याच्या निवासस्थानी घोष पथकाच्या स्वयंसेवकांनी धून वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर निवासस्थाना वरून घोष पथकाचे पथसंचलन स्मृती मंदिर येथे निघाले. Movement of Sangh Swayamsevak
ML/ML/PGB
10 Apr 2024