गेवराईमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाचे पथसंचलन
बीड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील गेवराई मध्ये रॅपिड ॲक्षन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले असून यावेळी पोलिसांनी नागरिकांना शांतता राहण्याचे आवाहन केलं आहे..
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड आणि माजलगाव मध्ये जी जाळपोळ करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये आता रॅपिडक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान दाखल झाले असून ग्रामपंचायतच्या निवडणुकी साठी देखील बीड जिल्ह्यात मोठी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे .
याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये शांतता राहावी यासाठी बीडच्या गेवराई मध्ये रॅपिडक्शन फोर्स दंगल नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिसांनी शहरात पतसंंचलन करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.
ML/KA/SL
4 Nov. 2023