ओबीसी सभेच्या अनुषंगाने जवानांचे पथसंचलन.

जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अंबड शहरात १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी समाजाच्या सभेच्या अनुषंगाने शहरात मुंबई येथून आलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्स, स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पथसंचलन केले. १७ नोव्हेंबर रोजी अंबड शहरातील धाईतनगर मैदानावर ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेसाठी ओबीसी समाजाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील OBC नेते सहभागी होणार आहेत. ही सभा निर्विघ्न,शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच स्तरातून खबरदारी घेण्यात येत आहे.
या सभेसाठी रहदारी नियमन करण्यासोबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १ पोलीस अधीक्षक,३ अप्पर पोलीस अधीक्षक,६ उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच १ हजार पेक्षा जास्त पोलीस अंमलदार,होमगार्ड,राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच नवी मुंबई येथून रॅपिड अँक्शन फोर्स (RAF) चे सेकंड इन कमांड इंद्रनील दत्त,असिस्टंट कमांडंट गौरी सिंग (RAF)यांच्या नेतृत्वाखाली १२० जणांची १ तुकडी देखील अंबड शहरात दाखल झाली आहे.
रॅपिड ऍक्शन फोर्स चे जवान,स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी अंबड शहरातून पथसंचालन करत १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं दाखवून दिले आहे. Movement of jawans on the occasion of OBC meeting.
ML/KA/PGB
16 Nov 2023