वीजबील सक्ती व पीक विमा कंपन्याच्या विरोधात चक्का जाम अंदोलन
वीजबील सक्ती व पीक विमा कंपन्याच्या विरोधात चक्का जाम अंदोलन
बीड दि १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून सक्तीची वीजबील वसुली चालू असल्याचा आरोप शिवसेना ( ऊबाठा ) ने केला आहे.
२०२० चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतीवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे संपूर्ण पिक जमिनदोस्त झालेले आहे, त्यामुळे त्या संकटाला तोंड देता देता शेतकऱ्यांची मानसिकता आत्महत्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा आरोपही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
याच्याविरोधात आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, माजलगाव, गेवराईसह विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना लवकरात पीक विमा मिळवून द्यावा आणि सक्तीची विज बील वसूली तात्पुरती थांबवावी तसेच २०२२ चा पिक विमा सरसकट मंजूर करावा यासाठी हे चक्का जाम आंदोलन केले गेले .
गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा रस्त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंबादास दानवे यांच्या सह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ML/KA/SL
1 Dec. 2022