रायबरेलीमध्ये रूळावर मातीचा ढीग, लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील खीरों पोलीस स्टेशन परिसरातील रघुराज सिंह रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा पाहून पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन थांबवली. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. रायबरेली-रघुराज सिंह पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटला मातीचा ढिगारा दिसला. त्यामुळे इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन रुळावरून घसरण्यापासून वाचली. सुमारे २० मिनिटांनी ट्रेन पुन्हा रवाना करण्यात आली.