EV चार्जिंग नेटवर्कसाठी अदानी आणि महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार

 EV चार्जिंग नेटवर्कसाठी अदानी आणि महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याची क्रेझ वाढली आहे. यामुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण कमी होण्यास हातभार लागत असल्यामुळे सरकारकडूही या वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र याबरोबरच या वाहनांच्या चार्जिगसाठी मोठे नेटवर्क उभारणे आवश्यक आहे. हे विस्तारित नेटवर्क उभारण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा आणि अदानी टोटल एनर्जी हे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढत्या मागणीदरम्यान चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी एकत्र आले आहेत. भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी अदानी टोटल एनर्जी (ATEL) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

महिंद्रा आणि ATEL यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेला सामंजस्य करार देशभरात ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एक रोडमॅप तयार करेल. याव्यतिरिक्त ही भागीदारी नेव्हिगेशन आणि ग्राहकांना चार्जिंग नेटवर्कमध्ये ऍक्सेस प्रदान करण्यासाठी ई-मोबिलिटीचे सोल्युशन देईल. या सहकार्याने XUV400 ग्राहकांना आता Bluesense+ ॲपवर 1100 पेक्षा जास्त चार्जर वापरता येतील. ज्यामुळे महिंद्रा EV मालकांसाठी चार्जिंगची सोय आणि सुलभता वाढेल. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, ‘हा करार EV चार्जिंग पायाभूत सुविधा वाढविण्यात मदत करेल आणि आमच्या ग्राहकांना चार्जिंग नेटवर्क आणि डिजिटल इंटिग्रेशनचा नियमित वापर करता येईल.’

अदानी टोटल गॅस लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सीईओ सुरेश पी मंगलानी म्हणाले, “ईव्ही क्षेत्रातील अदानी टोटल गॅस लिमिटेडच्या विस्ताराच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.” अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड ही अदानी टोटल गॅस लिमिटेडची उपकंपनी आहे. भारताच्या पुढील पिढीच्या स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ते समर्पित आहे. विविध क्षेत्रांमध्ये स्वच्छ ऊर्जा सोल्युशन प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून ATEL भारताच्या शाश्वत आणि विद्युतीकरणाच्या दिशेने प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे.

SL/ML/SL

22 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *