स्वप्निल जोशी निर्मित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज

 स्वप्निल जोशी निर्मित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

सध्याल महिलांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या मराठी चित्रपटांचा ट्रेंड आला आहे. मराठीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशी अशाच आशयाचा एक चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल निर्माता या भूमिकेत दिसणार आहे. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून “नाच गं घुमा” या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला तर आलं आहे. स्वप्नील जोशीनं “नाच गं घुमा ” या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, स्त्री ही घराची राणी असली तरी ,घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच ! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… ‘नाच गं घुमा’ !मे महिन्यात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’”

स्वप्नील त्याच्या निर्मिती प्रवासाबद्दल बोलताना म्हणतो “नाच गं घुमा” या चित्रपटाचा सह निर्माता होण ही माझ्यासाठी खूप आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. कायम परेश मोकाशी चे चित्रपट बघत आलो आणि मी त्यांचा फॅन आहे म्हणून आयुष्यात एकदा तरी त्यांचा सोबत काम करायला मिळावं ही इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते आहे. वाळवी पासून हा प्रवास सुरू होऊन आता ” नाच गं घुमा ” पर्यंत येऊन पोहचला आहे. मधुगंधा आणि परेश यांच्या सोबत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आणि या दोघा मुळे मी निर्मिती विश्वात पदार्पण करतोय. नुकतच चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण होऊन आजच्या दिवशी चित्रपटाचं पोस्टर येणं आमच्या सगळ्या साठी भाग्याची गोष्ट आहे. उत्तम कथानक , उत्कृष्ठ संगीत आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या सगळ्यांचा मेळ जुळून येऊन “

नाच गं घुमा ” घडतोय याचा खूप आनंद आहे. चांगल्या गोष्टींचा भाग होण्याचा अभिमान कायम असतो आणि यावेळी वेगळ्या भूमिकेत असल्याने हा अभिमान अजून जास्त वाढला आहे कारण चांगल्या कलाकृती चा भाग होण आणि आपल्या हातून चांगली कलाकृती एक निर्माता म्हणून घडण ही खूप कमालीची बाब आहे. एक उत्तम माणूस घडताना आज माझ्या आयुष्यात स्त्री वर्गाचा खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून “नाच गं घुमा ” सारखा चित्रपट माझ्याहातून घडण हा निव्वळ योगायोग आहे असं मला वाटतं. लवकरच चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येईल कधी येणार? केव्हा येणार? या साठी थोडी वाट बघावी लागणार आहे पण माझ्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीम या साठी उत्सुक आहे.” असंगी स्वप्निलने म्हटलं आहे.

SL/KA/SL

8 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *