बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोस्ट वॉंटेड आरोपीला अटक

मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची 6 महिन्यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथे हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीच्या पंजाब पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पंजाबमध्ये झिशान अख्तर याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे.