शेतकऱ्याने 11 वर्ष जोपासलेली मोसंबीची बाग जेसीबीने केली नष्ट…
जालना दि १७ : जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्याची हृदयद्रावक अवस्था समोर आली आहे. मोसंबीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने तब्बल 11 वर्ष जोपासलेली मोसंबीची बाग जेसीबीने उद्ध्वस्त केली आहे.
जालन्याच्या दहिफळ येथील शेतकरी दिलीप काळे यांनी सुमारे 11 वर्षांपूर्वी त्यांच्या अडीच एकर शेतात 278 मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती.
मात्र मागील काही वर्षांपासून मोसंबीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भाव, फळगळ आणि वाढता खर्च यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. या परिस्थितीला कंटाळून जालन्याच्या दहिफळ येथील शेतकरी दिलीप काळे यांनी आपल्या अडीच एकरातील तब्बल 278 मोसंबीची झाडं जेसीबीने तोडून टाकली आहेत.ML/ML/MS