मोसंबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बागेवर फिरवला जेसीबी.
जालना दि २५ : मोसंबीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने 25 वर्ष जोपासलेल्या मोसंबी बागेवर जेसीबी फिरवला आहे. बदनापूर तालुक्यातील घोटण येथील शेतकऱ्याने अडीच एकरांवरील मोसंबी बाग जेसीबीने नष्ट केली आहे. बाजारात मोसंबीला समाधानकारक दर मिळत नसल्याने जालन्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. घोटण येथील शेतकरी बळीराम पांडुरंग जगताप यांनी 25 वर्षांपूर्वी सुमारे दोन ते अडीच एकरात मोसंबीची झाडं लावली होती. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून बाजारात मोसंबीला योग्य दर मिळत नाहीये. शिवाय मोसंबी बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून मोसंबी फळगळचे प्रमाण देखील वाढले आहे. या सर्व संकटांमुळे हैराण झालेल्या बळीराम जगताप यांनी आपली सुमारे अडीच एकरांवरील मोसंबी बाग जेसीबीने नष्ट केली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.ML/ML/MS