जगभरातील ४५ हजारांहून प्रजाती नामशेष होणार?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान बदलासह पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी गेल्या काही दशकांमध्ये सुरू असलेल्या मानवी प्रयत्नांमुळे जगभरातून ४५,००० हून अधिक प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविषयक एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्राणी आणि वनस्पतींबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत.
इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) गुरुवारी धोक्यात आलेल्या प्रजातींची ताजी यादी जाहीर केली आहे. गेले काही वर्षे ही यादी जाहीर केली जाते. धोक्यात असलेले प्राणी, वनस्पती यांच्याबद्धल यात माहिती दिली जाते. या यादीमध्ये आता १,६३,०४० प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे सहा हजारांनी वाढ झाली आहे. चिलीच्या अटाकामा किनारपट्टीवरील वाळवंटातील कोपियापोआ कॅक्टी, बोर्नियन हत्ती आणि ग्रॅन कॅनरिया महाकाय सरडे या सजीवांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती ‘आययूसीएन’ने दिली आहे.
More than 45 thousand species of the world will become extinct?
ML/ML/PGB
28 Jun 2024