आजही Indigo ची 400 हून अधिक विमाने रद्द

 आजही Indigo ची 400 हून अधिक विमाने रद्द

मुंबई, दि. ८ : Indigo Airlines ने देशभर घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या आजच्या सलग सातवा दिवशीही ४०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली. गेल्या मंगळवारपासून देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी असलेल्या इंडिगोने ४,५०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द केली आहेत, ज्यामुळे हा त्यांच्या इतिहासातील सर्वात गंभीर विमान वाहतूक संकट ठरला आहे.
सोमवारी इंडिगोच्या संकटाचा परिणाम त्यांच्या शेअरवरही दिसून आला. इंडिगो एअरलाइन्सची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. बाजार उघडल्यानंतर शेअर्स ७% पेक्षा जास्त घसरले. इंडिगोचे शेअर्स बीएसईवर ७.४४% घसरून ४९७१.७५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर प्रवाशांना उड्डाण विलंब आणि शेवटच्या क्षणी रद्द होण्याचे प्रकार सुरू राहिल्याने लांब रांगा आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला. या संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनल संकटात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. इंडिगोच्या उड्डाणे रद्द करणे आणि विलंब करण्याबाबत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आम्हाला समजते की लाखो लोक अडकले आहेत. काहींना तातडीचे काम असू शकते आणि ते प्रवास करू शकत नाहीत. परंतु भारत सरकारने या समस्येची दखल घेतली आहे. वेळेवर पावले उचलली गेली आहेत असे दिसते. सध्या आम्हाला कोणतीही निकड दिसत नाही.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *