200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

 200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

जगदलपूर, दि. १७ : छत्तीसगढ येतील जगदलपूर येथे 153 शस्त्रांसह एकूण 208 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष आहेत. नक्षलवादी शस्त्रे समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतील. जगदलपूर येथे होणारा हा आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला.

या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नक्षलवादाविरुद्धच्या लढाईतील एक ऐतिहासिक दिवस’ असे वर्णन केले आहे. अमित शहा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा केली की, “अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जी एकेकाळी नक्षलवादाची तळे होती, ती आज नक्षलवादी दहशतीपासून मुक्त घोषित करण्यात आली आहेत. नक्षलवादाचा थोडासा अंश आता केवळ दक्षिण बस्तरमध्येच शिल्लक आहे, तोही सुरक्षा दलांकडून लवकरच पुसून टाकला जाईल.”

नॉर्थवेस्ट सब झोनल ब्युरो प्रमुख असलेला माओवादी कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता या आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत प्रमुख नावे आहेत. 21 मे रोजी छत्तीसगढ येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस चकमकीत नंबाला केशवराजू उर्फ बसवराज याच्या मृत्यूनंतर माओवादी कॅडरला जबरदस्त मानसिक हादरा बसला होता. मात्र त्याआधी एप्रिल महिन्यापासून रुपेश केंद्र सरकारसोबत शस्त्रसंधी आणि शांती वार्ता व्हावी अशा विचारांची मांडणी करत होता. आत्मसर्पण करण्याच्या भूपतीच्या भूमिकेचे त्याने समर्थन केले होते.

SL/ML/SL 17 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *