राज्यातील फार्मसी महाविद्यालयांत १५ हजारांहून अधिक जागा रिक्त
मुंबई, दि. २१ : राज्यातील फार्मसी कॉलेजांमधील बीफार्म अभ्यासक्रमांच्या १५ हजारांहून अधिक जागा तर एमफार्म अभ्यासक्रमांच्या ८१५ जागा रिक्त राहिल्या आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. फार्मसी अभ्यासक्रमांची ही प्रवेश प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी संपली.
फार्मसी प्रवेशांच्या प्रक्रियेला ७ जुलै रोजी प्रारंभ झाला. राज्याच्या सीईटी सेलच्यावतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली. चार कॅप फेऱ्या आणि संस्थास्तरीय प्रवेशांची मुदत १७ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. बीफार्मच्या राज्यात एकूण ४६,५३० जागा होत्या. त्यापैकी, ३०,५९४ जागा भरल्या असून १५,९३६ रिक्त राहिल्या आहेत. एमफार्मच्या ८,६२४ जागा असून ७,८०९ जागा भरल्या आहेत तर ८१५ रिक्त आहेत.
फार्मसी कॉलेजांमधील जागा रिकाम्या राहण्याकरिता उशिराने झालेली प्रवेशप्रक्रिया कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात येते आहे. इंजिनीअरिंगची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर फार्मसीचे प्रवेश केले जातात. अनेक विद्यार्थ्यांना फार्मसीला प्रवेश घेण्याची इच्छा असते. मात्र, इंजिनीअरिंगला आधी प्रवेश मिळाल्याने तिथे विद्यार्थी आपले प्रवेश निश्चित करतात.
SL/ML/SL