फक्त एका क्लिकवर मिळवा १५०० हून अधिक सरकारी योजनांची माहिती

 फक्त एका क्लिकवर मिळवा १५०० हून अधिक सरकारी योजनांची माहिती

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र या योजना संबंधितांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक लाभार्थी या योजनांपासून वंचित राहतात.कारण सरकारच्या अनेक विभागांच्या संकेतस्थळांवर या योजनांची माहिती विखुरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या १५०० हून अधिक महत्त्वाच्या योजनांची माहिती आता एका छताखालीच उपलब्ध होणार आहे.या योजनांविषयीची अपडेट आता अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. https://www.myscheme.gov.in/ या संकेतस्थळावर तुम्हाला योजनांची माहिती घेता येईल. या साईटवर गेल्यावर इतर साईटवर जाण्याची गरज नाही. तुम्हाला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.

हे पोर्टल उघडल्यावर त्यावर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुम्ही योजनेचे नाव टाईप केले तर ती योजना तपशिलवार येईल. त्या योजनेची इत्यंभूत माहिती मिळेल.यातील काही विभागनिहास सेवा

पोर्टलवर अर्थ मंत्रालयाच्या 121 सेवा उपलब्ध
निवृत्त वेतनासंबंधीच्या 60 सेवा मिळतील
आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 72 सेवा

या पोर्टलवर क्लिक करताच तुम्हाला लिंग आणि वयाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर राज्याचे नाव, तुमचा प्रवर्ग, सामान्य एससी, एसटी वा ओबीसी ते नमूद करा. इतर तपशील जमा करा. त्यानंतर सर्व योजनांची माहिती समोर येईल

SL/KA/SL

4 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *