अयोध्येसाठी देशभरातून सुटणार १ हजारहून अधिक विशेष ट्रेन्स

अयोध्या, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकांच्या वनवासानंतर अखेरीस आता अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी विराजमान होणार आहेत. अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचा नेत्रदीपक असा उद्घाटन सोहळा होणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून श्रीराम भक्त अयोध्येत जाण्यास उत्सुक आहेत. या भाविकांसाठी १९ जानेवारीपासून देशभरातून १ हजारहून विशेष ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत.
प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या अभिषेकानंतर 23 जानेवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. या गाड्यांद्वारे, अयोध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह 25 प्रमुख शहरांशी जोडले जाईल, ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
- या शहरांमधून अयोध्येसाठी विशेष गाड्या धावणार
- दिल्ली
- मुंबई
- चेन्नई
- बेंगळुरू
- पुणे
- कोलकाता
- नागपूर
- लखनौ
- जम्मू
पर्यटकांची अपेक्षित गर्दी पाहता अयोध्या स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. नवीन स्टेशनमध्ये दररोज ५० हजार लोकांना हाताळण्याची क्षमता असेल. हे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
SL/KA/SL
18 Dec. 2023