लोक न्यायालयात १ हजार हून अधिक प्रकरणे निकाली; फुलला पती पत्नीचा संसार

 लोक न्यायालयात १ हजार हून अधिक प्रकरणे निकाली; फुलला पती पत्नीचा संसार

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्हयातील सर्व तालुका आणि जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात एक हजाराहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा , सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत तसेच दाखलपूर्व प्रकरणे असलेल्या पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटविण्याकरीता लोक न्यायालयामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. आज आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका दिवसात वाशिम जिल्हयामधील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एकुण १ हजार ६ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व १८३ प्रकरणे असे एकूण १ हजार १८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

एकूण ४ कोटी ६१ लक्ष १० हजार ९१८‌ रक्कमेची प्रकरणे निकाली काढण्यात आली.राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यामध्ये वकील संघाचे तसेच जिल्हा पोलीस दलाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्यान, पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला की ते नाते तुटण्याच्या दिशेने जाऊ लागते आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात आणले जाते. मात्र लग्नाची ही नाती संपुष्टात येऊ नयेत म्हणून न्यायालयही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न करीत असते. या लोक अदालतमध्ये असेच विभक्त राहत असलेल्या दोन वैवाहिक वादाच्या प्रकणांमध्ये पती पत्नी यांच्यात प्रेमाचा समेट घडवून आणल्यामुळे त्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.

यावेळी न्या.‌आर.पी. पांडे यांनी या दाम्पत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ‌करून त्यांच्या भावी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या.लोक न्यायालयाव्दारे त्यांचा संसार फुलल्यामुळे त्यांच्या चेह-यावर हास्य उमटलेले दिसून आले.More than 1 thousand cases settled in People’s Court; The world of husband and wife

ML/KA/PGB
10 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *