९ ऑगस्ट क्रांतीदिनी होणार गिरणी कामगारांची मूक मिरवणूक!

मुंबई, दि ६
येत्या शनिवारी दि.९ ऑगस्ट “क्रांतीदिनी” सकाळी ९ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ५० वर्षांपूर्वीच्या प्रथेप्रमाणे, गवालिया टॅंकमैदानारील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नाना चौक येथील अग्निशमन केंद्राजवळून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक काढण्यात येईल.यंदा घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेली १४ कामगार संघटनांची,”गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”प्रथमच या मूक मिरवणुकीत सहभागी होत आहे.समितीचे नेते आणि असंख्य गिरणी कामगार कार्यकर्ते या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात सहभागी होत आहेत,तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,सेवादल,महिला फ्रंट सालाबादप्रमाणे या मिरवणुकीत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतील.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष लढा समितीचे प्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर या मूक मिरवणूकीचे नेतृत्व करतील आणि गवालिया टॅन्क मैदानावरील हुतात्मा स्मारकाला सर्वांच्या वतीने,पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील.कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी सर्व कामगार संघटनांचे नेते आणि कामगारांना मोठ्या संख्येने या अभिवादन मिरवणुकीत सामील व्हावे, असे आवाहन कामगारनेते गोविंदराव मोहिते यांनी केले आहे. KK/ML/MS