मूग डाळ चिला
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मूगाच्या डाळीचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिवळी मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. किंवा डोसा बनवण्याच्या २ तास आधी डाळ भाज्यात भिजवा. त्यानंतर डाळ पाण्यातून बाहेर काढून एका मोठ्या गाळणीत ठेवा किंवा पाणी व्यवस्थित काढून तुम्ही ताटातही ठेवू शकता. विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और२) जीरं, हळद, मीठ, कांदा, कढीपत्ता, लसूण, मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा. त्यात गरजेनुसार पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. ३) त्यानंतर एका नॉनस्टीक पॅनला तेल लावून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात चमच्याच्या साहाय्याने डोश्याचं पीठ घाला आणि गोलाकार फिरवा. डोसा एका बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर तो दुसऱ्या बाजूला फिरवा.साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत ४) त्यावर पुदिना, कोथिंबीरची हिरवी चटणी घाला. त्यानंतर कोथिंबीर आणि पनीरचं मिश्रण घाला. पनीरचं मिश्रण तव्यावर घातल्यानंतर डोसा फोल्ड करा. तयार आहे प्रोटीन्सयुक्त मूग डाळ चिला. ५) पनीरचं मिश्रण तयार करण्यासाठी पनीरचे तुकडे मॅश करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यार जीर, मोहोरी आणि मिरचीची फोडणी द्या. त्यात पनीर, हळद, मीठ घालून परतून घ्या. एक वाफ काढल्यानंतर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या.
ML/ML/PGB 7 Dec 2024