#कर आणि निर्गुंतवणुकीतून अधिक महसुलाच्या उद्दीष्टावर मूडीज ने व्यक्त केला संशय

 #कर आणि निर्गुंतवणुकीतून अधिक महसुलाच्या उद्दीष्टावर मूडीज ने व्यक्त केला संशय

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने (Moody’s Investors Service) 2021-22 च्या अर्थसंकल्पात (Budget) कर आणि निर्गुंतवणुकीतून (Tax and Disinvestment) जास्त महसूल संकलन करण्याच्या उद्दिष्टांवर शंका व्यक्त केली आहे. परंतू अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वित्तीय तुटीमुळे सार्वभौम पतमानांकनाच्या स्थितीबाबत पतमानांकन संस्थेने काहीही सांगितलेले नाही.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट (Fiscal deficit) 9.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतू सर्वसाधारण मत असेही होते की वित्तीय तुट सात टक्के राहील. पुढील आर्थिक वर्षात वित्तीय तूट 6.8 टक्के रहाण्याचा अंदाज आहे. सरकारने पुढील आर्थिक वर्षात बाजारातून 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पतमानांकन संस्थेने (Rating agency) निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 6.8 टक्क्यांच्या वित्तीय तुटीचे लक्ष्य आर्थिक वाढीला आधार देणे आणि वित्तीय तूट कमी करणे यामधील समतोल राखण्याचा प्रयत्न आहे. मात्र कर अनुपालनामध्ये सुधारणा आणि कमाईचे (Monetization) लक्ष्य प्राप्त करणे कठीण होईल.
Tag-Moody’s/Budget/Tax and Disinvestment
PL/KA/PL/2 FEB 2021

mmc

Related post