यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

 यंदा मान्सून जोरदार बरसणार, स्कायमेटचा पावसाचा अंदाज

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. नुकत्याच आलेल्या भारतातील नद्यांच्या परिस्थितीवरील अहवालात महत्वाच्या नद्यांमध्ये ४० टक्केच पाणी राहिल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेक नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातही बराचसा भाग हा पाण्याविना व्याकुळलेला आहे. ऐन मार्चमध्येच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या राज्याला दिलासा देणारी बातमी आली आहे.

यंदाच्या पावसाळ्याचा दुसरा टप्पा चांगला जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये थोडी वाट पहावी लागू शकते असा अंदाज स्कायमेटचा आहे. असे असले तरी उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेकडील भागात पुरेसा चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जुलै आणि ऑगस्टच्या काळात कमी पावसाचा धोका आहे. ईशान्य भारतात हंगामाच्या पहिल्या टप्प्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनो वरून ला निनामध्ये रुपांतरीत होताना हंगामाची सुरुवात विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Monsoon will rain heavily this year, Skymet rain forecast

ML/ML/PGB
16 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *