९ ते १६ जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
छ. संभाजीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कधी येईल ? तसेच यावर्षीचा पावसाळा कसा असेल ? याबाबतची माहिती दिली. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली असून ३१ मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ९ ते १६ जून दरम्यान या मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये होईल. गेल्या वर्षी एल निनो सक्रिय झालेला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र यावर्षी एल निनोची स्थिती या आठवड्यामध्ये संपुष्टात आली असून येणाऱ्या तीन ते पाच आठवड्यामध्ये ला नीनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ML/ML/SL
23 May 2024