नव्या सुविधांसह मोनोरेल पुन्हा धावण्यास सज्ज

 नव्या सुविधांसह मोनोरेल पुन्हा धावण्यास सज्ज

मुंबई, दि. 21 : काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल आता अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज होऊन पुन्हा धावू लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. ही सुरक्षा मान्यता ‘ब्युरो व्हेरिटास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल या १९.५४ किमी मार्गावरील सेवा २०२५ मध्ये वारंवार बिघाडांमुळे बंद करण्यात आली होती. आता आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल पुन्हा रुळांवर धावण्यास सज्ज झाली आहे.

नवीन ‘मेड इन इंडिया’ रेक्समध्ये २१ बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, दिव्यांगांसाठी आसनव्यवस्था, मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग पॉइंट्स, मार्ग दाखवणारे डिजिटल नकाशे, सुधारित सस्पेन्शन, अग्निसुरक्षा उपाय, मेट्रोसारखी अंतर्गत रचना आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली देण्यात आली आहे. आता संपूर्ण मार्गाची अंतिम तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पाहणी करणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोनोरेलची प्रवासी सेवा अधिकृतपणे पुन्हा सुरू होईल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *