वाशीम शहरात वानरांचा उच्छाद, सामानाचे मोठे नुकसान..

वाशिम दि १७:– वाशीम शहरात वानरांनी उच्छाद मांडला असून वानरांची अनेक टोळकी सध्या वाशीम शहरातील मुख्य चौकात धुमाकूळ घालत आहेत. अख्खं वानराच टोळकं घरात घुसून सामानाची नासधूस करत असून वानरांच्या धावपळीत अचानक रस्त्यावर दुचाकीसमोर आल्याने अपघात सुद्धा घडले आहेत. वानरांचा उच्छादाने डिश, सोलर पॅनलच नुकसान होत आहे.
घरावरून थेट दुचाकी, चारचाकी गाड्यांवर उड्या मारल्याने यात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. या वानरांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तातडीने वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करून शहरातील नागरिकांचे होत असलेले नुकसान थांबवून दिलासा देण्याची मागणी केली आहे.