गीतकार संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार

 गीतकार संतोष आनंद यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार

मुंबई, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर तीन दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये ५ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२३ देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे 17 वे वर्ष असून एक लाख रू धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षी गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, असे सांगताना आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की,
कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी नावाजलेले दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारे गीतकार संतोष आनंद यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना
मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि उमदा गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा 99 वा.वाढदिवस. असून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे या निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार आहे.
यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे “फिर रफी” या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

यापूर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ML/KA/SL

22 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *