मोहम्मद अली रोडवर खड्ड्यामुळे अपघातात वाढ

 मोहम्मद अली रोडवर खड्ड्यामुळे अपघातात वाढ

मुंबई प्रतिनिधी, दि. १४ : मोहम्मद अली रोड येथे जाकीर मंजिल सिग्नल येथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना चांगले मुश्किल झाले आहे. त्यामुळे या खड्ड्यात दुचाकी चालकांचे चाक अडकून अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तरीही खड्डित त्वरित बुजवावे अशी मागणी येथील स्थानिक दुकानदार रहिवासी आणि वाहन चालक करीत आहे. मोहम्मद अली रोड येथे मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केट तसेच विविध प्रकारचे घाऊक मार्केट असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक देखील मोठ्या प्रमाणात असते. परंतु रस्त्याच्या बाजूला असलेले मोठमोठे खड्डे दिसत नसल्याने आणि रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे पाय अडकून तसेच दुचाकी चालकांचे चाक अडकून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. हल्लीच एका खड्ड्यात अडकून आपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी रोज याच परिसरातून कामावर जात असते. आम्हाला देखील या खड्ड्यांचा सहन करावा लागत आहे. अरे हे खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी खाजगी कंपनी काम करणाऱ्या प्रेमिका दलाल या महिलेने दिली.
मोहम्मद अली रोड वर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्याअसून याबाबत मी महापालिका प्रशासनाला पत्रद्वारे हे खड्डे बुजवण्यासाठी कळवले आहे. लवकरच महापालिका प्रशासन हे खड्डे बुजवतील अशी ग्वाही स्थानिक नगरसेविका नसीमा जुनेजा यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *