आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

 आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया

चंद्रपूर, दि 3: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी मोफत मोतिबिंदू नेत्र तपासणी शिबिरे यशस्वीपणे पार पडली. या शिबिरांमध्ये तपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले, अश्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुल येथून ४२ आणि राजोली येथून १६ अशा एकूण ५८ रुग्णांना नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर आणि शालिनीताई मेघे वानाडोंगरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रुग्णांसाठी शस्त्रक्रियेसाठी नागपूरला ने-आण, निवास, भोजन व इतर सर्व सोयीसुविधांची व्यवस्था रुग्णालयाकडून करण्यात आली असून सर्व उपचार व शस्त्रक्रिया पूर्णतः निःशुल्क असतील. या उपक्रमातून नेत्रदोषित रुग्णांना नवदृष्टी मिळणार आहे.
आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नुकतेच, विसापूर, नांदगाव, हळस्ती, बामणी, कळमना, जूनोना, चीचपेल्ली, अजयपूर, कोठारी, दुर्गापूर, इंदिरा नगर, राजोली आणि मुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरे पार पडली. या शिबिरांना मोठ्या संख्येने रुग्णांनी आपले नेत्र तपासणी केली.
आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून हजारो शस्त्रक्रिया
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनेक शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १५ हजार हून अधिक रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, हे विशेष.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *