एक्स वर मोदी ठरले ग्लोबल लिडर, 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडिया (X) म्हणजेच ट्विटरवर (Twitter) 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्लोबल लिडर बनले आहेत. मोदी यांच्यापुढे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे नाव आहे. भारतातील आणि देश-विदेशातील दिग्गज नेते याबाबतीत त्यांच्या आसपासही नाहीत. ‘एक्स’वर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या पाच जागतिक नेत्यांमध्ये मोदी दुसऱ्या स्थानी आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यालाही मोदींनी फॉलोअर्सच्या बाबतीत मागे टाकलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यावर एक्स मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. “X वर 100 दशलक्ष! या सोशल मीडिया प्लॅटफॉवर आल्यावर चर्चा, वादविवाद, अंतर्दृष्टी, लोकांचे आशीर्वाद, विरोधकांची टीका या सर्व गोष्टींचा आनंद घेता आला. भविष्यातही तितक्याच या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न असेल.” अशी पोस्ट मोदींनी केली आहे. मोदी यांनी एक्सवर आंतरराष्ट्रीय स्टार टेलर स्विफ्ट ( 95.3 दशलक्ष ), लेडी गागा ( 83.1 दशलक्ष ) आणि किम कार्दाशियन ( 75.2 दशलक्ष ) यांना देखील मागे टाकले आहे. दरम्यान, मोदी यांच्या युट्युब चॅनलचे 25 दशलक्ष सब्सक्रायबर आहेत. तर इंस्टाग्रामवर 91 दशलक्ष फॉलोअर आहेत.