बाबासाहेबांच्या आंबडवे या मूळगावी असलेल्या दवाखान्याचे आधुनिकीकरण
मुंबई, दि. २० : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगाव मु. आंबडवे येथील सरकारी दवाखान्याचे आधुनिकीकरण करुन सामान्य जनतेला तातडीने वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, उपचार मिळावेत, यासाठी स्थानिक आंबवणे बु गावचे सुपुत्र विजय धों. घरटकर तसेच सहकारी नवतरुणांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी २७ तारखेला भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात विजय धों. घरटकर यांना सहकारी मित्र कॅप्टन शरद पा. धामणे, डॉ. सुशांत द. बांद्रे, इंजि. रुपेश ध. बांद्रे, भावेश भा. धामणे, दीपक पा. धामणे, नितेश म. धामणे, अमोल ध. घरटकर, मनोहर धों. घरटकर, श्री. चंद्रकांत बोर्ले (मु. आसवले) आदींनी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या सामाजिक उपक्रमात जनआरोग्य समिती मु. आंबडवे चे अध्यक्ष व सरपंच दिपीका दि. जाखल, डॉ. श्याम वि. कनांक, डॉ. आसिफ खान पठाण (सचिव), प्रताप घोसाळकर, शैलेश पोस्ठुरे, किरण धामणे, मु्रीधर श्री. जगताप, बबन मोरे, कल्पेश काप, दयानंद सकपाळ, रजनीकांत धोत्रे, राम जगताप, गीता पोस्ठुरे, सतिश बोर्ले तसेच मायभूमी फाऊंडेशनचे संस्थापक अनंत काप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच फाऊंडेशनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळींनी दवाखान्यास भेट देऊन डॉ. आसिफ खान यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार दवाखान्यासाठी तातडीने ECG मशीन, मॉनिटर, एचबी मॉनिटर, बेड, व्हीलचेअर, नेब्युलायझर, स्टेचर, वॉटर कूलर आदी उपकरणांची गरज निश्चित झाली. या तयारी दरम्यान विजय घरटकर यांनी विशेष पुढाकार घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी तत्परता दाखवली.
शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतां सरकारी दवाखाना, मु. आंबडवे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गृहराज्यमंत्र्यांच्या शुभहस्ते दवाखान्याला अत्याधुनिक उपकरणे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. तहसीलदार अक्षय अ. ढाकणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे स. आरोग्य अधिकारी डॉ. आसिफ खान, ग्रुप ग्रामपंचायत सर्व सदस्य, मुख्याध्यापक – आंबडवे भास्कर भा. जायभाये, सभापती आदेश किणी, सभापती, तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर आणि मायभूमी फाउंडेशनचे संस्थापक अनंत काप, महादेव रा धामणे, देवेंद्र गोटल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.