महाराष्ट्रातील या १६ ठिकाणी उद्या होणार युद्धाची Mock Drill

मुंबई, दि. ६ : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने उद्या देशभरात विविध ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे.
१ ला गट : अतिसंवेदनशील ठिकाणे .
यात मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे.
२ रा गट : ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड
३ रा गट : संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग
या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.