मनसे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको मनसे कार्यकर्ते स्थानबद्ध

 मनसे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको मनसे कार्यकर्ते स्थानबद्ध

बुलडाणा दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले याचा निषेध नोंदवण्यासाठी, सभा रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडें मनसे कार्यकर्त्यांसह शेगाव येथे येत असताना पोलिसांनी हा ताफा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अडविला.

त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली व त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले , पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व त्यांना स्थानद्ध केले तर काही मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या हातून निसटले असून ते शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी निघाल्या आहेत .

मनसे नेते संदीप देशपांडे आणि नीतीन सरदेसाई यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले असून त्यांना चिखली येथील विश्रामभवानात ठेवण्यात आले.

ML/KA/SL

18 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *