आमदार तामिळ सेल्वन यांची शिक्षा उच्च न्यायालयाकडून स्थगित

 आमदार तामिळ सेल्वन यांची शिक्षा उच्च न्यायालयाकडून स्थगित

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपाचे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांना झालेली सहा महिन्यांची शिक्षा उच्च न्यायालयाने स्थगित केली.
गुरू तेग बहादूर नगर (जीटीबी) येथील २५ इमारतींचा बेकायदा वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपाचे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांना सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सेल्वन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अपिलावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची आणि अपील निकाली निघेपर्यंत शिक्षा स्थगित करण्याची मागणी सेल्वन यांनी केली होती. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने सेल्वन यांची ही मागणी मान्य केली. त्यानुसार, सेल्वन यांनी शिक्षेविरोधात केलेले अपील निकाली निघेपर्यंत न्यायालयाने त्यांची शिक्षा स्थगित केली व त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. MLA Tamil Selvan’s sentence suspended by High Court

ML/KA/PGB
19 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *