भिवंडीत पर्यावरण रक्षणासाठी मियावाकी वृक्षारोपण …

भिवंडी दि २९ :- जंगल उध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे. अहमदाबाद येथील मेकिंग द डिफरन्स फांऊडेशन च्या सहकार्यातून उभारल्या जात असलेल्या मेकिंग द डिफरन्स यांच्यावतीने वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे.या उद्यानात 35 स्थानिक प्रजातींची 2350 झाडांची वृक्षलागवड केली जाणार आहे.